अनु. क्र. नियम
1 दि. २६/०९/२०२२ ते ०५/०९/२०२२ या नवरात्र काळात मंदिर पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहील.
2 मंदिरामध्ये प्रवेश करताना मास्कचा वापर बंधनकारक आहे.
3 65 वर्षांवरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षांखालील मुले यांनी नवरात्र काळामध्ये गडावर येण्याचे टाळावे . त्याऐवजी रेणुका देवी संस्थानच्या वेबसाईट वरून ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा.
4 दर्शन घेत असताना सामाजिक अंतर पाळले जाईल तसेच सॅनिटाइझर चा वापर करावा.
5 पेट्रोल पंप जवळ, माहूर येथील खाजगी वाहनतळावर भाविकांना त्यांचे खाजगी वाहनाचे पार्किंग करावे लागेल.
6 भाविकांना त्यांचे खाजगी वाहन टी पॉईंट माहूर येथून पुढे घेऊन जाता येणार नाही .
7 भाविकांना माहूर येथून रेणुका माता मंदिराकडे घेऊन जाणे येणे साठी एस टी बसेस ची सोय केली आहे.
8 भाविकांच्या सुविधेसाठी तैनात असलेल्या सेक्युरिटी गार्ड्स, व्यवस्थापक, पोलीस कर्मचारी व अधिकारी ह्यांना सहकार्य करावे.
9 गरजेच्या काळात पोलीस कंट्रोल रूम शी संपर्क साधा.