• नवरात्र महोत्सव काळात माहूरगडावर खाजगी वाहनांना प्रवेश बंद आहे.
  • खाजगी वाहनांसाठी नि:शुल्क वाहनतळाची (पार्किंगची) व्यवस्था प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे.
  • वाहनतळापासूनच गडावर जाण्यासाठी एसटी बसेस ची सुविधा महामंडळातर्फे करण्यात आली आहे.

पार्किंग क्र. 1 : पुसद रोड, माहूर

Get Direction

पार्किंग क्र. 2 : वाय पॉइंट जवळ, माहूर

Get Direction

टीप : एकावेळी वरिल पैकी एकच वाहनतळ खुले असणार आहे. बंदोबस्तासाठी तैनात पोलीस आपणास मार्गदर्शन करतील.

  • भाविक भक्तांच्या सेवेसाठी माहूरगडावर वैद्यकीय मदत केंद्र कार्यरत आहेत.
  • आपातकालीन स्थितीमध्ये उपचार मिळण्यासाठी अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सज्ज रुग्णालय माहूर शहरात कार्यानिव्त करण्यात आले आहे.
  • गरजू रुग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनातर्फे मोफत रुग्णवाहिका (अ‍ॅंबुलन्स) उपलब्ध असणार आहेत.

गडावरील दर्शन रांगेतील वैद्यकीय उपचार केंद्र

Get Direction

ग्रामीण रुग्णालय माहूर

Get Direction

  • आपातकालीन स्थितीमध्ये जवळच्या पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधा किंवा 9403689327 ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.
  • नवरात्रौत्सवादरम्यान संस्थानतर्फे दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोफत अन्नछत्र चालवले जाते.
  • उपवास असणार्‍या भाविकांसाठी उपवासाची साबुदाना खिचडी व फलाहार (केळी) अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
  • अन्नछत्र श्री रेणुका देवी मंदिराच्या मागील बाजूस श्री भगवान परशुराम मंदिरासमोरील मंडपात चालू आहे.
  • भाविक भक्तांनी अन्नछत्र प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
Visitors: 1866