।। श्री रेणुका माता प्रसन्न ।।
श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड
🌺 ।। श्री रेणुकायै नमः ।।
🌺 ।। ॐ ऐं ह्रीं क्लीं श्री रेणुकायै नमः ।। 🌺 | साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ
हेल्पलाईन: 9850335335 भाविक संख्या: 13,165,387 लॉगिन
🏛️ तीर्थक्षेत्र दर्शन २०२६ 🏛️

मान्यवरांच्या भेटी — २०२६

माहूर गडावर आदिशक्ती श्री रेणुका मातेच्या चरणी लीन झालेले विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ मान्यवर, पदाधिकारी व मान्यवर भाविक

।। वर्ष २०२६ मधील मान्यवरांच्या भेटी ।।

आश्विन शुद्ध चतुर्थी

अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी घेतले श्री रेणुका देवीचे दर्शन

अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी आज श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने संस्थानचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, विश्वस्त चंद्रकांत भोपी आणि विश्वस्त संजय कान्नव यांनी त्यांचा सन्मान केला.

आश्विन शुद्ध तृतीया

जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांचा सपत्नी सत्कार

आश्विन शुद्ध तृतीया

माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सहकुटुंब श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले.

आश्विन शुद्ध तृतीया

कीर्तनकार सौ. सुवर्णा सचिन कुलकर्णी यांचा सन्मान करताना संस्थानचे विश्वस्त श्री. संजय कान्नव.

आश्विन शुद्ध व्दितीया

छत्रपती संभाजीनगर येथील सुनील कुलकर्णी यांनी अभंगवाणी सादर केली. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

आश्विन शुद्ध व्दितीया

शारदीय नवरात्र महोत्सवात सांस्कृतिक कलावंतांचा सन्मान करताना विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी व केदार गुरुजी.

आश्विन शुद्ध व्दितीया

डॉ. किरण जाधव, आयुक्त, सेवा हक्क आयोग, छत्रपती संभाजीनगर विभाग, महाराष्ट्र राज्य यांचा संस्थानतर्फे सन्मान करण्यात आला.

आश्विन शुद्ध प्रतिपदा

श्री रेणुका देवी संस्थानच्या अध्यक्षा श्रीमती हिरा शेळके यांचा सत्कार संस्थानचे विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय काण्णव आणि श्री. अरविंद देव यांनी केला.

आश्विन शुद्ध प्रतिपदा

माजी मंत्री श्री. धनंजय मुंडे यांना श्री रेणुका देवी संस्थानतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली.

आश्विन शुद्ध प्रतिपदा

कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संतोष बांगर यांनी सपत्नीक श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले