आश्विन शुद्ध दशमी ( ०५ ऑक्टोबर २०२२ )
महाआरती
वरदायी डोंगरावरून भगवान परशुराम यांची पालखी श्री रेणुका देवी मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी विधिवत अभिषेक करून महाआरती करण्यात आली.
श्री रेणुकादेवी मंदिरावरून भगवान परशुरामाची पालखी निघून जवळच असलेल्या जंगलातील वरदायी डोंगरावर पालखी नेण्यात आली.
श्री रेणुकादेवी मंदिरावरून भगवान परशुरामाची पालखी निघून जवळच असलेल्या जंगलातील वरदायी डोंगरावर पालखी नेण्यात आली. तिथे सोने रुपी आपटा चे पूजन करून पालखीत ठेवण्यात आले व पालखी परत श्री रेणुकादेवी मंदिरावर आणण्यात आली.
श्री रेणुका देवी मंदिरासमोरून भगवान परशुरामाची पालखी काढण्यात आली.
शस्त्रपूजन नंतर महाआरती करण्यात आली.
माहूर गडावर आज विजयादशमी निमित्त शस्त्र पूजन करण्यात आले.
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर श्री रेणुका देवी मंदिरासमोरील मानाच्या निशाणाची पूजा
आज बुधवारी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर श्री रेणुका देवी मंदिरासमोरील मानाच्या निशाणाची पूजा विधी अभिषेक व महाआरती विश्वस्त श्री चंद्रकांत भोपी, विश्वस्त दुर्गादास भोपी, विश्वस्त बालाजी जगत, विश्वस्त आशिष जोशी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
आश्विन शुद्ध नवमी ( ०४ ऑक्टोबर २०२२ )
श्री रेणुका देवीच्या ऐतिहासिक व पारंपारिक होमकुंडासमोर प्रतिकात्मक कोहळ्याचा अजाबली देण्यात आला.
नवमीला होम हवानाचा पूर्ण हूती कार्यक्रम माहूरगडावर संपन्न झाला.
आश्विन शुद्ध अष्टमी ( ०३ ऑक्टोबर २०२२ )
महाआरती
अष्टमीला सायंकाळी होमहवनाचे आठ अध्याय संपल्यानंतर श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री शशिकांत बांगर यांनी श्री रेणुका देवीची महाआरती केली.
कुमारिका पूजन
श्री रेणुका देवी मंदिरासमोरील ऐतिहासिक होमकुंडासमोर श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री शशिकांत जी बांगर यांच्या हस्ते कुमारी का पूजन करण्यात आले.
होम हवन
श्री रेणुका देवीच्या मंदिरासमोरील पारंपारिक ऐतिहासिक होम कुंडात अष्टमीच्या होमहवनास संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री शशिकांत जी बांगर यांनी अष्टमीच्या होमाची सपत्नीक विधिवत पूजा केली. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी,विश्वस्त संजय कांनव, विश्वस्त अरविंद देव, विश्वस्त दुर्गादास भो, विश्वस्त आशिष जोशी, व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होम हवन
श्री रेणुका देवीच्या मंदिरासमोरील पारंपारिक ऐतिहासिक होम कुंडात अष्टमीच्या होमहवनास संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री शशिकांत जी बांगर यांनी अष्टमीच्या होमाची सपत्नीक विधिवत पूजा केली. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी,विश्वस्त संजय कांनव, विश्वस्त अरविंद देव, विश्वस्त दुर्गादास भो, विश्वस्त आशिष जोशी, व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अष्टमीच्या होमाची अभूतपूर्व तयारी
माहूर गडावर काल सायंकाळी श्री रेणुका देवीच्या अष्टमीच्या होमाची अभूतपूर्व अशी तयारी करण्यात आली होती.
आश्विन शुद्ध अष्टमी
श्री रेणुका देवी मंदिरावर प्रतिपदेच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठास प्रारंभ करण्यात आला होता. आज अष्टमीला पाठ पूर्ण झाले आहेत पाठाचे पौराहित्य पुजारी रवींद्र कानव व पुजारी मनोज बनसोडे यांनी केले आहे.
श्री रेणुका देवीला नैवेद्य दाखवून, धूप दाखवून विश्वस्त श्री संजय कांनव यांनी महाआरती केली.
श्री रेणुका देवीची विधिवत पूजा अभिषेक करून आठवी माळ चढविण्यात आली.
आज अष्टमी निमित्त श्री रेणुका देवीची विधिवत पूजा अभिषेक करून आठवी माळ चढविण्यात आली. विश्वस्त चंद्रकांत भोपि विश्वस्त संजय कांनव, विश्वस्त अरविंद देव यांनी घटाची पूजा केली.
आश्विन शुद्ध सप्तमी ( ०२ ऑक्टोबर २०२२ )
माहुर गडावर आज श्री रेणुकादेवी च्या दर्शनासाठी झालेली गर्दी
गडावर आज सप्तमी निमित्त भव्य असे कुमारिका पूजन करण्यात आले
आश्विन शुद्ध षष्ठी ( ०१ ऑक्टोबर २०२२ )
श्री रेणुका देवीची महाआरती
आज सहाव्या माळेनिमित्त निमित्त देवीस अभिषेक करून विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी श्री रेणुका देवीची महाआरती केली.
आज नवरात्र उत्सवाची सहावी माळ
आज नवरात्र उत्सवाची सहावी माळ श्री रेणुका देवीचे घटास आज विधीवत पूजा करून सहावी माळ विश्वस्त श्री चंद्रकांत भोपे यांनी बांधली.
आश्विन शुद्ध ललिता पंचमी ( ३० सप्टेंबर २०२२ )
कुमारिका पूजन
आज माहूर गडावर ललिता पंचमी निमित्त कन्या पूजन करण्यात आले. पुसद येथील राष्ट्रीय दिव्यांग संस्थेतील निराधार व निराश्रीत मुलींचे कुमारीका पूजन करण्यात आले.
श्री रेणुका देवी ला फुलोरा चढविण्यात आला.
श्री रेणुका देवीचा नवरात्र उत्सवाचा आज पाचवा दिवस ललिता पंचमी आज श्री रेणुका देवी ला फुलोरा चढविण्यात आला. आज श्री रेणुका माता समोर संगीत क्षेत्रातील वादन गायक साहित्य ठेवलेले आहे.
आज ललिता पंचमी निमित्त श्री रेणुका देवीचा घटास पाचवी माळ चढविण्यात येऊन महाआरती करण्यात आली.
आश्विन शुद्ध चतुर्थी ( २९ सप्टेंबर २०२२ )
श्री रेणुका देवीची अलंकार पूजा अभिषेक तसेच चौथी माळ चढवून महाआरती करण्यात आली.
माहूर गडावर आज नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी श्री रेणुका देवीची अलंकार पूजा अभिषेक तसेच चौथी माळ चढवून महाआरती करण्यात आली त्यानंतर छबिना काढण्यात आला. चौथ्या माळीची महाआरती विश्वस्त संजय कानव यांनी केली.
आश्विन शुद्ध तृतीया ( २८ सप्टेंबर २०२२ )
कुमारिका पूजन
बुधवारी माहूरगडावर दुपारी कुमारिका पूजन करण्यात आले. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपीं, संजय कांनव,दुर्गादास भोपी,अरविंद देव,आशिष जोशी, बालाजी जगत, पुजारी भवानीदास भोपी, चंद्रकांत रिठे, अनिल कांनव यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.
श्री रेणुकादेवी संस्थान
श्री रेणुकादेवी संस्थान विश्वस्त समितीने माहूर गडावर श्री रेणुका देवीच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. श्री रेणुकादेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या भगवान परशुराम मंदिरासमोर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. गेल्या तीन दिवसापासून हजारो भाविक या स्वादिष्ट महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.
श्री रेणुका देवीची आज तिसऱ्या माळीची महाआरती करण्यात आली.
श्री रेणुका देवीची आज तिसऱ्या माळीची महाआरती करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने श्री रेणुका देवीच्या दर्शनाकरिता उपस्थित होते.
श्री रेणुका देवी नवरात्र उत्सवात आज बुधवार तिसरी माळ चढविण्यात आली.
आश्विन शुद्ध व्दितीया ( २७ सप्टेंबर २०२२ )
श्री रेणुका देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
माहूर गडावर श्री रेणुका देवीच्या दर्शनाकरिता राज्यातील व परराज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
श्री रेणुका देवीची अलंकार पूजा
माहूरगडावर आज दुसऱ्या माळी निमित्त श्री रेणुका देवीची अलंकार पूजा करण्यात आली.
माहूरगडावर आज दुसऱ्या माळी निमित्त श्री रेणुका देवीची विधिवत पूजा करण्यात आली.
माहूरगडावर आज दुसऱ्या माळी निमित्त श्री रेणुका देवीची विधिवत पूजा करून दुसरी माळ चढविण्यात आली. त्यानंतर पायस नैवैद्य दाखवून विश्वस्त चंद्रकांत भो, संजय कानंव, आशिष जोशी,अरविंद देव यांनी श्री रेणुका देवीची महाआरती केली. यावेळी पुजारी चंद्रकांत रिठे उपस्थित होते.
आश्विन शुद्ध द्वितीया ( २७ सप्टेंबर २०२२ )
आज नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी माहूर गडावर श्री रेणुका देवीची पूजा करताना विश्वस्त विनायकराव फांदाडे ,पुजारी चंद्रकांत रिठे. तसेच मंदिराची आज विविध रंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे.मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण आहे.भाविकांचा आई जगदंबे च्या नावाने जल्लोष ऐकावयास मिळत आहे
आश्विन शुद्ध प्रतिपदा ( २६ सप्टेंबर २०२२ )
सहाय्यक जिल्हाधिकारी श्री किर्तीकिरण पुजार यांची नवरात्र महोत्सवास हजेरी.
सहाय्यक जिल्हाधिकारी श्री किर्तीकिरण पुजार ह्यांनी नवरात्र महोत्सवास सपत्नीक हजेरी लावून आई रेणुकेच्या महापूजेत सहभाग नोंदवला व भाविकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा मुख्य न्यायाधीश शशिकांत बांगर ह्यांनी नवरात्र महोत्सवास हजेरी लावली.
जिल्हा मुख्य न्यायाधीश शशिकांत बांगर ह्यांनी नवरात्र महोत्सवास हजेरी लावून आई रेणुकेच्या महापूजेत सहभाग नोंदवला व भाविकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
क्लीन नवरात्री ग्रीन नवरात्री
संस्थानचे सचिव श्री किर्तीकिरण पुजार ह्यांनी क्लीन आणि ग्रीन नवरात्री ह्या विषयावर लक्ष वेधले.
माहूर गडावर आज कुमारी का पूजन करण्यात आले.
माहूर गडावर आज संस्थानचे अध्यक्ष श्री शशिकांत जी बांगर यांच्या हस्ते कुमारी का पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा संस्थानचे कोषाध्यक्ष सचिव श्री कीर्ती किरण पुजार, खासदार हेमंत पाटील यांच्यासह विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कांनव,अरविंद देव, दुर्गादास भोपी,व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुमारिका पूजन
माहूर गडावर आज संस्थानचे अध्यक्ष श्री शशिकांत जी बांगर यांच्या हस्ते कुमारी का पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा संस्थानचे कोषाध्यक्ष सचिव श्री कीर्ती किरण पुजार, खासदार हेमंत पाटील यांच्यासह यांच्यासह विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कांनव,अरविंद देव, दुर्गादास भोपी,व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहूर गडावर आज कुमारी का पूजन करण्यात आले.
माहूर गडावर आज संस्थानचे अध्यक्ष श्री शशिकांत जी बांगर यांच्या हस्ते कुमारी का पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा संस्थानचे कोषाध्यक्ष सचिव श्री कीर्ती किरण पुजार, खासदार हेमंत पाटील यांच्यासह विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कांनव,अरविंद देव, दुर्गादास भोपी,व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहूर गडावर आज संस्थानचे अध्यक्ष श्री शशिकांत जी बांगर यांच्या हस्ते कुमारी का पूजन करण्यात आले.
माहूर गडावर आज संस्थानचे अध्यक्ष श्री शशिकांत जी बांगर यांच्या हस्ते कुमारी का पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा संस्थानचे कोषाध्यक्ष सचिव श्री कीर्ती किरण पुजार, खासदार हेमंत पाटील यांच्यासह विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कांनव,अरविंद देव, दुर्गादास भोपी,व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहूर गडावर आज सकाळी संगीत सेवेचे दीप प्रज्वलन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थांनचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री शशिकांतजी बांगर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, संस्थांनचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार श्री किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्हव, अरविंद देव, दुर्गादास भोपी उपस्थित होते.