श्री दत्त शिखर मंदिर
माहूरपासून 5 किमी भगवान दत्तात्रयाचे निवासस्थान आहे.
माता अनुसया मंदिर
माहूरपासुन 6 किमी अंतरावर अत्रीऋषीव महासती अनुसया मातेचा आश्रम आहे.
भगवान परशुराम मंदिर
श्री रेणुकामाता मंदिराच्या दक्षिणेला देवी गडावरून पायथ्याशी 50 पाय-या स्थित आहे.
मातृतिर्थ
माहूरपासून दक्षिणेस दीड किमी अंतरावर आहे. रेणुकामातेने आपल्या अहिताग्नि पतीसह अग्निप्रवेश केल्यानंतर हृया ठिकाणी और्ध्वदहिक सर्व कर्म भगवान दत्तात्र यांनी परशुरामांकडून करून घेतले ते हे प्रसिध्द मातृतिर्थ हृया ठिकाणी धार्मिक पिंडदान व श्राध्दविधीसुध्दा केल्या जातात.
संत विष्णुकवींचा मठ
माहूरपासून दक्षिणेस दीड किमी अंतरावर कलियुगात रेणुकामातेने संत विष्णूदासांना साक्षात दर्शन दिलेले पवित्र स्थान. हृयाच ठिकाणी संत विष्णूदासांची समाधी आहे व ज्या स्वरूपामध्ये रेणुकेने विष्णूदासांना दर्शन दिले ते मूळस्वरूप चित्र हृया ठिकाणी आजही दर्शनार्थ आहे. हे स्वरूपचित्र स्वतः विष्णूदासांनी काढलेली आहे.
महाकाली मंदिर
रेणुका मंदिराच्या उत्तरेला रामगड किल्लामध्ये महाकालीचे स्थान आहे. गोंडराजांनी देवीची प्रतिष्ठापना केली आहे.
कैलासटेकडी
वनदेवपासून 1 किमी अंतरावर आहे. कैलासटेकडी ही सहयाद्री पर्वतावरील सर्वात उंच टेकडी असून अत्यंत जागृत ठिकाण आहे. दत्तात्रयांच्या पादुका ह्या ठिकाणी आहे. हृया ठिकाणी भगवान दत्तात्रयांनी गोरखनाथांना दर्शन दिले होते असे हे पवित्र ठिकाण आहे.