।। अंबे एक करी ।।
श्रीमंत जगन्माता माहूरनिवासीनी रेणुका देवी चरणी सादर भावपुष्प
विघ्ने दुर करी, स्वधर्म-उद्धरी, दारिद्रय माझे हरी ॥
चित्ती मुर्ती बरी, वर-अभय करी, ध्यातो तुला अंतरी ।
वाचा शुध्द करी, विलंब न करी, पावे त्वरे सूंदरी ॥
माझा हेतु पुरे, मनात न उरे, संदेह माझा हरे ॥
जेणे पाप सरे, कुबुध्दी विसरे, ब्रम्हैक्य-धी संचरे ।
देई पुर्ण करे, भवाम्बुधी तरे, ऎसे करावे त्वरे ॥
भवसागरी सांग कैसा तरु वो ॥
अन्यायी मी हे तुझे लेकरु वो ।
नको रेणुके दैन्य माझे करु वो ॥
सदेह तारानिक रैविभाती ॥
श्री मुळपिठाचल चंडिकायां ।
तां एकवीरां शरणं प्रपद्ये ॥
दिना बालकाला नको दुखवू वो ॥
ब्रीदा रक्षी तु आपुल्या श्री भवानी ।
ही प्रार्थना ऐकुनि कैवल्यदायनी ॥
।। श्री रेणुका माता की जय । जगदंब जगदंब ।।
श्री रेणुका महात्म्य वाचा
माहूर गडाचा प्राचीन इतिहास, परशुराम व माता रेणुकेची संपूर्ण कथा.
महात्म्य पहा