श्री रेणुका देवी मंदिरात लक्ष्मीपूजन व महाआरती
दीपावलीच्या पावन पर्वावर संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते मातेचे विधीवत लक्ष्मीपूजन संपन्न झाले. पूजनानंतर मंदिराच्या मुख्य सभामंडपात महाआरती संपन्न झाली.
लक्ष्मीपूजनानंतर सामूहिक प्रार्थना व स्तवन
माहूर गडावर श्री रेणुका देवी मंदिरात लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मातेची नित्य प्रार्थना व स्तोत्रपठण भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने करण्यात आले.
मंदिरावर आकर्षक नयनरम्य विद्युत रोषणाई
दीपावलीनिमित्त संपूर्ण मंदिर परिसरावर व पायऱ्यांच्या मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. शेकडो समई व दिव्यांनी गड उजळून निघाला होता.
महालक्ष्मी पूजनानिमित्त विशेष पुष्प सजावट व अलंकार पूजा
मातेच्या गाभाऱ्यात सुगंधित फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. दीपावलीनिमित्त श्री रेणुका मातेची सुवर्णालंकार पूजा बांधण्यात आली.