नागपूर / विदर्भ मार्ग
नागपूर ते माहूर अंतर सुमारे २२० किमी. यवतमाळ व आर्णी मार्गे थेट एस.टी. महामंडळाच्या बसेस व चांगला राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहे.
नांदेड / मराठवाडा मार्ग
नांदेड जिल्हा मुख्यालयापासून माहूर अंतर सुमारे १३० किमी. नांदेड बसस्थानकावरून दर तासाला माहूरसाठी थेट बसेस धावतात.
रेल्वे मार्ग (किनवट स्टेशन)
जवळचे रेल्वे स्टेशन किनवट (Kinwat - ५० किमी). नंदीग्राम एक्सप्रेसने किनवटला उतरून तेथून माहूरसाठी नियमित बस व टॅक्सी मिळतात.
हैद्राबाद / तेलंगणा मार्ग
हैद्राबादपासून अंतर सुमारे २६० किमी. NH-44 राष्ट्रीय महामार्गाने आदिलाबाद मार्गे माहूरला ५ ते ६ तासांत पोहोचता येते.
गडावर जाण्यासाठी सुविधा
- पायऱ्या: पायथ्यावरून सुमारे २०० सुलभ पायऱ्या असून संपूर्ण मार्गावर पत्र्याचे सावली शेड व रेलिंग आहे.
- वाहन रस्ता: नवरात्र काळात पार्किंग पासून फक्त एस.टी.बसेस गडाच्या पायथ्याशी जाऊ शकतात.
- ज्येष्ठ नागरिक सोय: वयस्कर व आजारी भाविकांसाठी पालखी/डोली व्यवस्था उपलब्ध आहे.
- पार्किंग: नवरात्र काळात माहूर T पॉइंट व Y पॉइंट वर विस्तीर्ण पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे.