।। श्री रेणुका माता प्रसन्न ।।
श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड
🌺 ।। श्री रेणुकायै नमः ।।
🌺 ।। ॐ ऐं ह्रीं क्लीं श्री रेणुकायै नमः ।। 🌺 | साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ
हेल्पलाईन: 9850335335 भाविक संख्या: 13,165,387 लॉगिन
शारदीय नवरात्रौत्सव

।। दैनंदिन दर्शन २०२३ ।।

माहूर गड — श्री रेणुका मातेचे पावन दर्शन, महापूजा व विशेष अलंकार दर्शन

मुखपृष्ठ » दर्शन व सेवा » दैनंदिन दर्शन २०२३
॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध दशमी

२४ ऑक्टोबर २०२३
अश्विन शुद्ध दशमी
आश्विन शुद्ध दशमी : महाआरती

आज विजयादशमी निमित्त श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त अरविंद देव, विश्वस्त आशिष जोशी, विश्वस्त विनायकराव फांदाडे, विश्वस्त बालाजी जगत, विश्वस्त दुर्गादास भोपी.

॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध नवमी

२३ ऑक्टोबर २०२३
अश्विन शुद्ध नवमी
पूर्णाहुती सोहळा

आज नवमीला माहूर गडावर पूर्णाहुती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्या नंतर संस्थानचे अध्यक्ष तथा नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी सपत्नीक महाआरती केली. याप्रसंगी विश्वस्त,पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्विन शुद्ध नवमी
पूर्णाहुती सोहळा

आज नवमीला माहूर गडावर मुख्य होम कुंडा समोर पूर्णाहुती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थानचे अध्यक्ष तथा नांदेड चे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी हा विधी सपत्नीक पार पाडला. याप्रसंगी विश्वस्त,पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्विन शुद्ध नवमी
होम कुंडा समोर कोहळ्याचा आजाबली

आज नवमीला माहूर गडावर मुख्य होम कुंडा समोर कोहळ्याचा आजाबली देण्यात आला. पुजारी भवानीदास भोपी यांनी कोहळ्याचा तलवारीने आजाबली दिला.यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा नांदेड चे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्यासह विश्वस्त,पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्विन शुद्ध नवमी
सपत्नीक कुमारीका पूजन व सुहासिनी पूजन

श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष तथा नांदेड चे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी सपत्नीक कुमारीका पूजन व सुहासिनी पूजन केले. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कानव, विश्वस्त आशिष जोशी, विश्वस्त बालाजी जगत,विश्वस्त दुर्गादास भोपी, विश्वस्त अरविंद देव,पुजारी भवानीदास भोपी, व्यवस्थापक योगेश साबळे यांचे सह पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्विन शुद्ध नवमी
श्री रेणुका देवीची आजची महाआरती🚩🚩🚩
अश्विन शुद्ध नवमी
आजचा श्री रेणुका देवीचा फोटो
अश्विन शुद्ध नवमी
आज अष्टमी निमित्त श्री रेणुका देवीच्या होम हवन विधी नंतर

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री नागेश न्हावकर यांनी सपत्निक महाआरती केली.

अश्विन शुद्ध नवमी
श्री रेणुका देवीच्या होम हवन विधी नंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

आज अष्टमी निमित्त श्री रेणुका देवीच्या होम हवन विधी नंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री नागेश न्हावकर यांनी सपत्निक महाआरती केली.

अश्विन शुद्ध नवमी
अष्टमी निमित्त श्री रेणुका देवीच्या मानाचा होम हवन

आज अष्टमी निमित्त श्री रेणुका देवीच्या मानाचा होम हवन विधीस प्रारंभ करण्यात आला.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री नागेश न्हावकर हे सपत्निक होम हवन विधीस बसले आहेत.यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कानव, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब सिनगारे उपस्थित होते. पौरहित्य निलेश केदार गुरुजी व त्यांच्या विद्यार्थी यांनी केले.

॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध अष्‍टमी

२२ ऑक्टोबर २०२३
अश्विन शुद्ध अष्‍टमी
आश्विन शुद्ध अष्टमी : होम हवन विधीस प्रारंभ
अश्विन शुद्ध अष्‍टमी
आश्विन शुद्ध अष्टमी : होम हवन विधीस प्रारंभ

आज अष्टमी निमित्त श्री रेणुका देवीच्या मानाचा होम हवन विधीस प्रारंभ करण्यात आला.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री नागेश न्हावकर हे सपत्निक होम हवन विधीस बसले आहेत.यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब सिनगारे उपस्थित होते. पौरहित्य निलेश केदार गुरुजी व त्यांच्या विद्यार्थी यांनी केले.

अश्विन शुद्ध अष्‍टमी
अष्टमी निमित्त श्री रेणुका देवी मंदिर परिसरामध्ये छबिना करण्यात आला.
अश्विन शुद्ध अष्‍टमी
आश्विन शुद्ध अष्टमी : कुमारिका पूजन व सुहासिनी पूजन

अष्टमीनिमित्त कुमारिका पूजन व सुहासिनी पूजन करण्यात आले. पुजारी मंगेश रिठे, पुजारी शुभम भोपी, पुजारी मिलिंद कांनव यांनी पूजन केले. विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त विनायकराव फांदाडे, विश्वस्त संजय कान्नव, विश्वस्त बालाजी जगत, विश्वस्त अरविंद देव यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्विन शुद्ध अष्‍टमी
आश्विन शुद्ध अष्टमी : महाआरती

अष्टमी निमित्त श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त अरविंद देव.

अश्विन शुद्ध अष्‍टमी
आश्विन शुद्ध अष्टमी

आज अष्टमी निमित्त श्री रेणुका देवीच्या घटास विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त विनायकराव फांदाडे, विश्वस्त बालाजी जगत, विश्वस्त अरविंद देव यांनी आठवी माळ बांधली.

॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध सप्‍तमी

२१ ऑक्टोबर २०२३
अश्विन शुद्ध सप्‍तमी
राज्याचे शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी आज श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले.

विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब सिनगारे यांनी संस्थांनच्या वतीने सत्कार केला.

अश्विन शुद्ध सप्‍तमी
राज्याचे शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी आज श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले.
अश्विन शुद्ध सप्‍तमी
सरस्वती पूजन

श्री रेणुका देवी समोर सरस्वती पूजन करताना विश्वस्त चंद्रकांत भोपी.

अश्विन शुद्ध सप्‍तमी
सरस्वती पूजन
अश्विन शुद्ध सप्‍तमी
आश्विन शुध्द सप्तमी : कुमारिका पूजन

संस्थान चे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांनी कुमारिका पूजन करून आरती केली.

अश्विन शुद्ध सप्‍तमी
आश्विन शुध्द सप्तमी : कुमारिका पूजन

औरंगाबाद खंडपीठा चे न्यायमूर्ती श्री शैलेश ब्रम्हे  यांनी सपत्नीक कुमारिका पूजन केले व आरती केली.यावेळी उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब सिनगारे, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव, विश्वस्त आशिष जोशी, विश्वस्त बालाजी जगत,विश्वस्त दुर्गादास भोपी, विश्वस्त अरविंद देव, पुजारी भवाणीदास भोपी, पुजारी शुभम भोपी उपस्थित होते.

अश्विन शुद्ध सप्‍तमी
आश्विन शुध्द सप्तमी : कुमारिका पूजन

आज शनिवारी सप्तमी निमित्त श्री रेणुका देवी मंदिर येथे कुमारिका पूजन विधी विश्वस्त अरविंद देव यांनी केले.विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव, विश्वस्त आशिष जोशी, विश्वस्त बालाजी जगत,विश्वस्त दुर्गादास भोपी उपस्थित होते.

अश्विन शुद्ध सप्‍तमी
आश्विन शुद्ध सप्तमी : कुमारिका पूजन

आज शनिवारी सप्तमी निमित्त श्री रेणुका देवी मंदिर येथे कुमारिका पूजन विधी विश्वस्त अरविंद देव यांनी केले. विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव, विश्वस्त आशिष जोशी, विश्वस्त बालाजी जगत, विश्वस्त दुर्गादास भोपी उपस्थित होते.

अश्विन शुद्ध सप्‍तमी
आश्विन शुद्ध सप्तमी

आज सप्तमीनिमित्त श्री रेणुका देवीच्या घटास सातवी माळ चढविण्यात आली. पुजारी भवानिदास भोपी, पुजारी शुभम भोपी यांनी सप्तमी ची माळ बांधली.

अश्विन शुद्ध सप्‍तमी
आश्विन शुद्ध सप्तमी : महाआरती

आज शनिवारी सप्तमी निमित्त श्री रेणुका देवीची महाआरती करण्यात आली.

अश्विन शुद्ध सप्‍तमी
आज शनिवारी सप्तमी निमित्त श्री रेणुका देवीचे मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे.
॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध षष्टी

२० ऑक्टोबर २०२३
अश्विन शुद्ध षष्टी
आश्विन शुद्ध षष्‍ठी : श्री रेणुका देवीचा जोगवा मागण्यात आला.
अश्विन शुद्ध षष्टी
आश्विन शुद्ध षष्‍ठी : कुमारिका पूजन व सुहासिनी पूजन करण्यात आले.
अश्विन शुद्ध षष्टी
आश्विन शुद्ध षष्‍ठी : महाआरती

शुक्रवारी श्री रेणुका देवीची महाआरती करण्यात आली.

अश्विन शुद्ध षष्टी
आश्विन शुद्ध षष्‍ठी : घट पूजा

आज सहाव्या दिवशी श्री रेणुका देवीच्या घटाची पूजा करून करून विश्वस्त संजय कान्नव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त अरविंद देव, विश्वस्त विनायक फांदाडे यांनी सहावी माळ बांधली.

अश्विन शुद्ध षष्टी
श्री रेणुका देवीचा आजचा फोटो
॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध ललिता पंचमी

१९ ऑक्टोबर २०२३
अश्विन शुद्ध ललिता पंचमी
दीपप्रज्वलन

ललिता पंचमी उत्सवाचे उद्घाटन दीपप्रज्वलन रेणुकादेवी संस्थानचे उपाध्यक्ष तथा माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब शिनगारे,साहित्यिक देविदास फुलारी, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, आशिष जोशी, दुर्गादास भोपी, अरविंद देव तसेच नांदेड येथील पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, वेद पाठशाळेचे निलेश केदार गुरुजी, प्रा.डॉ.मार्तंड कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

अश्विन शुद्ध ललिता पंचमी
ललिता पंचमी निमित्त कुमारिका पूजन व सुहासिनी पूजन करण्यात आले.
अश्विन शुद्ध ललिता पंचमी
ललिता पंचमी निमित्त श्री रेणुका देवीच्या घटाची विधीवत, पूजा अभिषेक करून चौथी माळ चढविण्यात आली.
अश्विन शुद्ध ललिता पंचमी
ललिता पंचमी निमित्त रेणुका देवीला महानैवेद्य दाखवून महाआरती पुजारी भवानिदास भोपी यांनी केली. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी ,अरविंद देव, बालाजी जगत, आशिष जोशी, पुजारी शुभम भोपी उपस्थित होते.
अश्विन शुद्ध ललिता पंचमी
ललिता पंचमी निमित्त श्री रेणुका देवी समोर आरास करण्यात आली होती.
अश्विन शुद्ध ललिता पंचमी
श्री रेणुका देवी च्या महाआरती नंतर मंदिर परिसरात छबीना काढण्यात आला.
अश्विन शुद्ध ललिता पंचमी
आज ललिता पंचमी

माहूर रेणुका देवी भक्तांसाठी एक महत्वाचा दिवस. आज रेणुका माता ही शब्द सुरांची मालकीण होऊन कला साधना करणाऱ्या प्रतीभावंतांना शुभ आशिष देत असते.

जिथे विष्णुदास महाराजांनी रचलेले पद गायिले जातात ते ऐकण्यास जगदंबा स्वतः समक्ष तिथं हजर होते.

॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध चतुर्थी

१८ ऑक्टोबर २०२३