१. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
पायऱ्या, मुख्य मंदिर व परशुराम मंदिर परिसर- श्री रेणुकादेवी संस्थानच्या परिसरात पहिल्या पायरीपासून ते थेट परशुराम मंदिरापर्यंत वॉटर कुलर, साधे पाणी व RO च्या पाण्याची उत्तम सुविधा करण्यात आली आहे.
- पायऱ्यांवर ठीकठिकाणी चढणाऱ्या भाविकांना पाणी पोहोच करण्यासाठी विशेष स्वयंसेवकांची व्यवस्था केली आहे.
- परिसरातील सर्व वॉटर कुलर्स व पाण्याच्या टाक्यांची संपूर्ण स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
- संस्थानच्या पाणी पुरवठा यंत्रणेचे मोटर पंप, पाईपलाईन व वॉल्व्ह्स दुरुस्त करून मुबलक साठा सज्ज ठेवला आहे.
- सर्व RO मशिन्सचे संपूर्ण मेंटेनन्स (Maintenance) करून शुद्ध पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध आहे.
२. भाविकांची सुरक्षा व गर्दी नियंत्रण
रक्षक, CCTV, वॉकी-टॉकी व दर्शन वेळा- शारदीय नवरात्र महोत्सवात गर्दी नियोजनासाठी मर्यादित रोजंदारी स्वरूपाचे १६० उत्सव सेवक (महिला/पुरुष) नियुक्त करण्यात आले आहेत.
- भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ५० अतिरिक्त उत्सव सुरक्षा रक्षक (महिला/पुरुष) तैनात करण्यात आले आहेत.
- गर्दीवरील नियंत्रणासाठी एकूण १०६ CCTV कॅमेरे (७४ जुने + ३२ नवीन कायमस्वरूपी) बसवण्यात आले आहेत.
- संस्थानकडे स्वतंत्र वॉकी-टॉकी सेट्स असून त्यांचे संपूर्ण मेंटेनन्स करण्यात आले आहे.
- पायऱ्यांवरील गर्दीच्या ठिकाणी सूचना देण्यासाठी २ कायमस्वरूपी मेगाफोन व संपूर्ण मंदिर परिसरात अद्ययावत ध्वनिक्षेपण (PA System) यंत्रणा उपलब्ध आहे.
- मंदिर उघडणे व बंदची वेळ: भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री-चे मंदिर सकाळी ०५:०० वाजता उघडणे व रात्री १०:०० वाजता बंद ठेवण्यात येईल.
- महत्त्वाच्या व्यक्ती/अधिकारी दर्शन वेळ: सायंकाळी ०७:०० ते ०९:०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
३. आरोग्य व वैद्यकीय व्यवस्था
दवाखाना, रुग्णवाहिका, स्ट्रेचर व मोफत औषधे- भाविकांच्या प्राथमिक आरोग्यासाठी गडावर मोफत दवाखाना उपलब्ध आहे.
- अशक्त किंवा ज्येष्ठ भाविकांसाठी गडावरील दवाखान्यात व कार्यालयात स्ट्रेचरची (Stretcher) स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे.
- संस्थानची स्वतंत्र रुग्णवाहिका (Ambulance) आपत्कालीन सेवेसाठी सज्ज आहे.
- श्वासोच्छवासाच्या त्रासासाठी व तातडीच्या मदतीसाठी ऑक्सिजन सिलिंडरची (Oxygen Cylinders) व्यवस्था उपलब्ध आहे.
- भाविकांकरिता मोफत औषध वितरणाची पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे.
४. विद्युत व्यवस्था व जनरेटर
अखंड वीज पुरवठा, जनरेटर बॅकअप व वीजतंत्री- मंदिर परिसरात संपूर्ण विद्युत यंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली आहे.
- विद्युत पुरवठा खंडित झाल्यास संस्थानकडे स्वतंत्र ३० KVA व ६२ KVA चे दोन जनरेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत.
- मंदिर परिसरातील सर्व लाईट्स, फोकस दिवे व वायर्सची सखोल तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली आहे.
- उत्सव काळात कोणत्याही तातडीच्या कामासाठी अतिरिक्त वीजतंत्रींची (Electricians) नेमणूक केली आहे.
५. उत्सव महाप्रसाद (अन्नदान) सेवा
श्री परशुराम मंदिर परिसरात सात्विक महाप्रसाद- श्री-चे दर्शनाकरिता येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी, उत्सव कर्मचारी व इतर सेवकांसाठी श्री परशुराम मंदिर परिसरात महाप्रसादाचे उत्तम आयोजन करण्यात आले आहे.
- भाविकांसाठी वेळ: दुपारी ११:३० ते सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत अखंड महाप्रसाद वितरण.
- निवासी कर्मचाऱ्यांसाठी वेळ: रात्री ०७:०० ते १०:०० वाजेपर्यंत महाप्रसादाची सोय.
- रांगेत उभे राहून शिस्तबद्धरीतीने व तृप्तपणे महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे.
६. स्वच्छता व सुलभ शौचालय विभाग
शौचालये, कचरापेट्या व रोजची विल्हेवाट- संस्थानातर्फे पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळी सुलभ शौचालये 'Y' पॉईंट जवळ व मंदिराच्या दक्षिण बाजूस भरपूर पाण्यासह उपलब्ध आहेत.
- तसेच परशुराम मंदिर परिसरातसुद्धा सुलभ शौचालय भाविकांसाठी उपलब्ध आहे.
- शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
- मंदिर परिसरात कचरा होऊ नये यासाठी ठीकठिकाणी कचरापेट्या (Dustbins) ठेवण्यात आल्या असून, अतिरिक्त उत्सव सेवकांची व्यवस्था आहे.
- दैनंदिन निघणारा कचरा रोजच्या रोज कचरा डेपोमध्ये पाठवण्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.
७. इतर सोई-सुविधा (शेड, कुलर्स, वातानुकूलन व मंडप)
ऊन-पावसापासून संरक्षण, थंड हवा व वातानुकूलन यंत्रणा- येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पायऱ्यांवर नवीन टिन शेड व आवश्यक ठिकाणी भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
- दर्शन रांगेमध्ये लागल्यानंतर भाविकांसाठी थंड हवेच्या दृष्टीने मेगा आऊट डेझर्ट कुलर्स/फॅन्स लावण्यात आले आहेत. शेडमध्ये सिलिंग फॅन्स कार्यरत आहेत.
- मुख्य मंदिर सभामंडपामध्ये अद्ययावत वातानुकूलित (AC) यंत्रणा कार्यान्वित असून तिची पाहणी व दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.
- संपूर्ण मंदिर परिसरात मोकळ्या मोक्याच्या ठिकाणी ऊन व गर्दीपासून संरक्षणासाठी अतिरिक्त मंडप उभारण्यात आले आहेत.
कोणतीही मदत किंवा अधिक माहिती हवी आहे?
संस्थानच्या नियंत्रण कक्षाशी किंवा २४ तास मदत केंद्राशी संपर्क साधून तात्काळ साहाय्य मिळवा.