अश्विन शुद्ध दशमी
विजयादशमीनिमित्त छबिना काढण्यात आला
विजयादशमीनिमित्त श्री रेणुका देवीची महाआरती करण्यात आली
नवरात्र: स्वराज्य रक्षक संस्थेचा सन्मान
नवरात्र उत्सवात सोलापूर येथील स्वराज्य रक्षक संस्थेने सुरक्षा व्यवस्था पुरवली होती त्यांचा सन्मान संस्थांन च्या वतीने करण्यात आला .
श्री रेणुका देवीच्या महाआरती नंतर छबिना काढण्यात आला
विजयादशमी: रेणुका देवीच्या निशाणाची पूजा व महाआरती
विजयादशमीनिमित्त श्री रेणुका देवीच्या मुख्य निशाण उतरवून विधीवत पूजा करून पुन्हा उभे करण्यात आले व महाआरती करण्यात आली.
आज विजयादशमीचा श्री रेणुका देवीचा फोटो
अश्विन शुद्ध नवमी
अश्विन शुद्ध षष्टी
भाविकांचा महाप्रसाद घेण्यासाठी मोठा प्रतिसाद दिसत आहे
परशुराम मंदिरात महाप्रसादाचे आयोजन
श्री रेणुका देवी संस्थान तर्फे भगवान परशुराम मंदिर येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रेणुका देवी ची आज अलंकार पूजा करण्यात आली
आज षष्टी निमित्त श्री रेणुका देवीच्या घटा स माळ बांधण्यात आली
श्री रेणुका देवीची आज महाआरती करण्यात आली
गडावर आज कुमारिका पूजन करण्यात आले
आरती नंतरचा श्री रेणुका देवीचा आजचा फोटो
श्री रेणुका देवीचे आजचे फोटो
अश्विन शुद्ध ललिता पंचमी
ललिता पंचमीपासून श्री रेणुका देवीचे लाईव्ह दर्शन सेवा सुरू
देवीभक्तांना आई रेणुकेचे दर्शन सुलभ व्हावे ह्यासाठी आज ललिता पंचमीपासून श्री रेणुकादेवी संस्थान द्वारे लाईव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. लाईव्ह दर्शन सेवेचे उदघाटन करून सेवा आई रेणुका चरणी अर्पण करतानाची क्षणचित्रे.
ललिता पंचमी संगीत सेवेचा दीप प्रज्वलन सोहळा
ललिता पंचमीपासून रेणुका देवी लाईव्ह दर्शन सुविधा सुरू
देवीभक्तांना आई रेणुकेचे दर्शन सुलभ व्हावे ह्यासाठी आज ललिता पंचमीपासून श्री रेणुकादेवी संस्थान द्वारे लाईव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. लाईव्ह दर्शन सेवेचे उदघाटन करून सेवा आई रेणुका चरणी अर्पण करतानाची क्षणचित्रे.
श्री रेणुका देवीची आज ललिता पंचमी निमित्त फळांची आरास करण्यात आली.
ललिता पंचमी: श्री रेणुका देवी महाआरती
आज सोमवारी ललिता पंचमी निमित्त श्री रेणुका देवीची महाआरती करण्यात आली.
ललिता पंचमी निमित्त श्री रेणुका देवीस फुलोरा अर्पण करण्यात आला.
श्री रेणुका देवीच्या घटास आज पाचवी माळ बांधण्यात आली
ललिता पंचमी: श्री रेणुका देवीला आज अलंकार पूजा
ललिता पंचमी निमित्त आज श्री रेणुका देवीला अलंकार पूजा करण्यात आली.
श्री रेणुका देवीचा ललिता पंचमीचा आजचा फोटो
अश्विन शुद्ध चतुर्थी
शारदीय नवरात्रात रविवारी रेणुका देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
शारदीय नवरात्र उत्सवातील रविवारची सुट्टी म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणीच असते. आज रविवारी माहूरगडावर श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली.
माहूरगड: कुमारिका व सुहासिनी पूजन विश्वस्तांच्या हस्ते संपन्न
माहूरगडावर आज कुमारिका व सुहासिनी पूजन करण्यात आले. कुमारिका पूजन सोहळा विश्वस्त बालाजी जगत विश्वस्त अरविंद देव यांच्या हस्ते संपन्न झाला.
आज चौथ्या माळीची रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त व पुजारी उपस्थित होते.
आज रविवारी चौथ्या माळीची श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त अरविंद देव, यावेळी विश्वस्त व पुजारी भावीक - भक्त उपस्थित होते.
रविवारी रेणुका देवीच्या घटास चौथी माळ चढविताना विश्वस्त व पुजारी उपस्थित होते
रविवारी श्री रेणुका देवीच्या घटास चौथी माळ चढविताना विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त अरविंद देव, विश्वस्त बालाजी जगत, विश्वस्त विनायकराव फादाडे, पुजारी भवानीदास भोपी.
आज रविवारी श्री रेणुका देवीची अलंकार पूजा करण्यात आली
श्री रेणुका देवीचे अलंकार पूजन
अश्विन शुद्ध तृतीया
आज शनिवारी सकाळी श्री रेणुका देवीच्या महा आरती नंतर कुमारिका व सुहासिनी पूजन सोहळा संपन्न झाला आहे
आज शनिवारी तिसऱ्या वेळेस श्री रेणुका देवीची महाआरती करण्यात आली
श्री रेणुका देवीची महाआरती करण्यात आली
श्री रेणुका देवीस आज तांबूल विडा प्रसाद दाखविण्यात आला
माहूर गडावर आज नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री रेणुका देवीची अलंकार पूजा करण्यात आली
श्री रेणुका देवीच्या महाआरती नंतर कुमारिका पूजन करण्यात आले
श्री रेणुका देवीच्या महाआरती नंतर कुमारिका पूजन करण्यात आले. विश्वस्त चंद्रकांत भोपी, पुजारी भवानीदास भोपी, विश्वस्त संजय कान्नव, विश्वस्त अरविंद देव, पुजारी शुभम भोपी, गडावरील पुजारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री रेणुका देवीच्या घटासआज तिसरी माळ विधीवत पूजा करून चढविण्यात आली
श्री रेणुका देवीच्या घटास आज तिसरी माळ विधीवत पूजा करून चढविण्यात आली. ह्यावेळी उपस्थित विश्वस्त चंद्रकांत भोपी, पुजारी भवानीदास भोपी, विश्वस्त अरविंद देव, पुजारी शुभम भोपी.
आजचा तिसऱ्या माळेचा श्री रेणुका देवीचा फोटो
आज शनिवारी तिसऱ्या माळेला श्री रेणुका देवीचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे
श्री महालक्ष्मी मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे
श्री रेणुका देवी मंदिर परिसरातील परिसर देवता श्री हनुमान जी, श्री गणपती, प्रभू श्रीराम पादुका, श्री अत्री ऋषी, श्री तुळजाभवानी मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे.
श्री रेणुका देवीचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले
आज शनिवारी तिसऱ्या माळेला श्री रेणुका देवीचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे.
ऐतिहासिक मातृतिर्थ तलाव व माहूर शहराचे छायाचित्र
श्री रेणुका देवी मंदिरावरून परिसरातील घेतलेले विहांगम छायाचित्र... ऐतिहासिक मातृतिर्थ तलाव व माहूर शहराचे छायाचित्र.
आज शनिवार नवरात्र उत्सवातील तिसरी माळ
आज शनिवार नवरात्र उत्सवातील तिसरी माळ, श्री रेणुका देवीच्या दर्शनाकरिता भाविकांनी माहुर गडावर हजेरी लावली आहे.
श्री रेणुका देवीचे भाविकांना सुलभ दर्शन
श्री रेणुका देवीचे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे याकरिता मंदिराच्या पायथ्याशी मोठी एलसीडी स्क्रीन संस्थान तर्फे बसविण्यात आली आहे
अश्विन शुद्ध व्दितीया
अश्विन शुद्ध द्वितीया : महाआरती
अश्विन शुद्ध द्वितीया आज शुक्रवारी आई रेणुकेची महाआरती संस्थान चे विश्वस्त चंद्रकांत भोपी व विश्वस्त संजय कान्नव ह्यांनी केली.
अश्विन शुद्ध द्वितीया आज शुक्रवारी आई रेणुकेची महाआरती
अश्विन शुद्ध द्वितीया आज शुक्रवारी आई रेणुकेची महाआरती संस्थान चे विश्वस्त चंद्रकांत भोपी व विश्वस्त संजय कान्नव ह्यांनी केली.
आजचे देवीचे रूप
संगीत सेवेचे दीप प्रज्वलन
अश्विन शुद्ध द्वितीया आज शुक्रवारी दुपारच्या संगीत सेवेचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कानव यांनी दीप प्रज्वलन केले व अमरावती येथील मा शारदा भजनी मंडळ यांनी भजन सेवा सादर केली.
श्री रेणुका देवीचा छबिना मिरवणूक
आज शुक्रवारी दुसऱ्या माळीला माहुर गडावर श्री रेणुका देवीचा छबिना मिरवणूक काढण्यात आली.
शुक्रवारी माहूरगडावर कुमारीका पूजन करण्यात आले
श्री रेणुका देवीच्या दुसऱ्या माळेची महाआरती
आज शुक्रवारी श्री रेणुका देवीच्या दुसऱ्या माळेची महाआरती विश्वस्त संजय कांनव यांच्या हस्ते करण्यात आली.
रेणुका देवीचा नवरात्र उत्सवात आज शुक्रवारी घटास दुसरी माळ चढविण्यात आली.
आई रेणुकेची अलंकार पूजा
माहूरगड श्री रेणुका देवी शारदीय नवरात्र उत्सव 2024 : आज शुक्रवारी दुसऱ्या माळेला श्री रेणुका देवीची अलंकार पूजा करण्यात आली.
अश्विन शुद्ध व्दितीया : आई जगदंबेचे दर्शन
शारदीय नवरात्र उत्सव 2024 - नवरात्र उत्सव मंगल व भक्तिमय वातावरणात व उत्साहात श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड साजरा करत आहे. आज दुसऱ्या माळेला भाविकांनी आई जगदंबेचे दर्शन घेतले. संस्थानने आकर्षक फुलांनी मंदिर सजविले आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदा
अश्विन शुद्ध प्रतिपदा : नैवेद्य
अश्विन शुद्ध प्रतिपदेला आई रेणुकेला पुरणपोळी चा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
विडा भरवण्याचा विधी
अश्विन शुद्ध प्रतिपदेला आई रेणुकेला विडा भरवण्याचा विधी.
घटस्थापने नंतरचे आई रेणुकेचे रूप
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा नवरात्रौत्सवाचा प्रारंभ. आई रेणुकेचे आजचे सुंदर रूप व आकर्षक फुलांची सजावट.