१. शुद्ध पिण्याचे पाणी व जलव्यवस्थापन
जल पुरवठा, आरओ प्लांट्स व टाक्या व्यवस्था- सर्व आरओ फिल्टर प्लांट्स व टाक्यांची दैनंदिन तपासणी व शुद्धीकरण.
- गर्दीच्या मुख्य ठिकाणी अतिरिक्त पाण्याचे टँकर्स व थंड पाण्याच्या वितरणाची सोय.
२. आरोग्य, प्रथमोपचार व रुग्णवाहिका पथक
आपत्कालीन वैद्यकीय कॅम्प व जीवनरक्षक सेवा- कॅम्प १ (पायथा): २४ तास आपत्कालीन वैद्यकीय केंद्र व रुग्णवाहिका.
- कॅम्प २ (गाभारा): पहाटे ३:०० ते रात्री ९:०० थेट सेवा.
- कॅम्प ३ (दत्तशिखर): २४ तास प्रथमोपचार केंद्र.
३. सुरक्षा, बॅरिकेडिंग व पोलीस बंदोबस्त
गर्दी नियंत्रण, दर्शन रांगा व सुरक्षा तपासणी- २७० सुरक्षा रक्षक, ३०० होमगार्ड व ४० ट्रॅफिक पोलीस २४ तास तीन शिफ्टमध्ये तैनात.
- दर्शन रांगेत बॅरिकेड्स मजबूत ठेवणे व आपत्कालीन एक्झिट मार्ग सतत मोकळे ठेवणे.
४. स्वच्छता, निर्जंतुकीकरण व शेड व्यवस्था
पायऱ्या, सभामंडप व स्वच्छतागृहांची अखंड स्वच्छता- पायऱ्यांवर पाय घसरू नये म्हणून नियमित पाणी फवारणी व पुसणे.
- दर्शन शेडमध्ये डेझर्ट कुलर्समध्ये नियमित पाणी भरणे व हवेचे नियमन.
५. श्री अन्नदान व महाप्रसाद सेवा
लाखो भाविकांसाठी अखंड महाप्रसाद वितरण- स्वतंत्र रांगा व बसण्याची उत्तम व्यवस्था, पिण्याचे पाणी व ताट वाटप स्वयंसेवक.
- अन्नदान सेवा देणगीदारांचे स्वागत व अधिकृत पावती देण्याची स्वतंत्र व्यवस्था.
६. CCTV, संगणक व नियंत्रण कक्ष
केंद्रीय नियंत्रण, लाईव्ह प्रवाह व नेटवर्क व्यवस्था- मंदिर गाभारा, पायऱ्या, पार्किंग व अन्नदान परिसराचे थेट कॅमेरा मॉनिटरिंग.
- लाईव्ह दर्शन सर्व्हर, इंटरनेट व ध्वनिक्षेपक (माईक/स्पीकर्स) यंत्रणेचे नियंत्रण.
कोणतीही मदत किंवा अधिक माहिती हवी आहे?
संस्थानच्या नियंत्रण कक्षाशी किंवा २४ तास मदत केंद्राशी संपर्क साधून तात्काळ साहाय्य मिळवा.